पातळ ओलसर पृष्ठभागावर कोरोनाचा विषाणू तासनतास जिवंत राहू शकतो

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जगभरात मृत्यूचे थैमान माजविणाऱया कोरोनाचा कोविड-19 विषाणू पातळ ओलसर चिकट पृष्ठभागांवर कित्येक तास अथवा कित्येक दिवस जिवंत राहू शकतो. द्रव पदार्थातील रेणूंना घट्ट चिकटून बसत हा विषाणू बराच काळ जिवंत राहून अशा पृष्ठभागांशी संपका&त येणाऱया माणसांना आपला संसर्ग करू शकतो असा दावा आयआयटी मुंबईचे प्राध्यापक रजनीश भारद्वाज यांनी ’फिजिक्स ऑफ फ्लूइड्स’ या नियतकालिकात लिहिलेल्या आपल्या अभ्यास निबंधात केला आहे.

कोरोनाचा विषाणू अतिशय प्रतिकूल स्थितीतही कडक अथवा ओलसर पृष्ठभागाचा आसरा मिळाल्यास जिवंत राहत त्या पृष्ठभागाला स्पर्श करणाऱया माणसाला बाधित करू शकतो. विशेषत: धातू अथवा ओलसर पृष्ठभाग या कोविड विषाणूची आदर्श जागा ठरतात. कारण थोडासाही ओलसरपणा कोविड विषाणूला घट्ट चिकटून बसण्यासाठी उपयोगी येतो. त्यामुळे धातूची भांडी अथवा लाकडी, प्लास्टिक वस्तू वापरण्यापूर्वी ती पूर्ण कोरडी करून अथवा थोडी गरम करून वापरल्याने कोरोना संसर्गाचा धोका बऱयाच अंशी कमी होते. ओलसर पातळ पृष्ठभागाला चिकटून कोरोनाचा विषाणू काही तास अथवा काही दिवस जिवंत राहू शकतो असे अभ्यासाद्वारे स्पष्ट झाल्याचे प्रा. भारद्वाज यांनी केला आहे.

कसे आपले अस्तित्व राखतो कोविड -19

कोरोना बाधित रुग्णाच्या शिंकेतून अथवा थुंकीतून बाहेर पडलेला विषाणू त्याला ओलसर पृष्ठभाग मिळाल्यास त्याला घट्ट चिकटतो आणि पृष्ठभागावरील द्रव थेंबात काही तास अथवा दिवस जिवंत राहू शकतो. बाधित रुग्णाच्या शिंकेतील पाणी सुकून गेल्यावरही शिंकेचे थेम्ब पडलेला पृष्ठभाग दमट अथवा ओलसर असल्यास कोविड विषाणू आपले अस्तित्व त्यावर काही काळ टिकवून ठेवतो. द्रव पदार्थातील अणू-रेणूंमधील आकर्षणाचा लंडन वांडर वॉल फोर्सेस हा पदार्थ विज्ञानातील नियम कोरोना विषाणूला पृष्ठभागावर चिकटून राहण्यास कारणीभूत ठरतो असे प्रा भारद्वाज यांनी लेखात स्पष्ट केले आहे.रुग्णाच्या शिंकेतील ड्रॉप्लेट्स काही मिनिटांत वाळतात.पण ते कडक अशा पृष्ठभागावर पडल्यास बराच काळ ओलसर राहू शकतात.अशा पृष्ठभागांवरील ओलसरपणा किती काळ टिकतो यावर कोरोनाच्या विषाणूचा जिवंत राहण्याचा कालावधी अवलंबून असतो असे प्रा भारद्वाज यांनी स्पष्ट केले आहे.