
देशात गेल्या 24 तासांत सुमारे 34 हजार कोरोनाचे नवीन रुग्ण आढळले. त्यामुळे देशाची वाटचाल तिसऱ्या लाटेच्या दिशेने सुरू आहे का? अशी शंका उपस्थित होत आहे. दरम्यान, सहा दिवसांत रुग्णवाढीचा वेग सुमारे पाचपट वाढला आहे.
केंद्रीय आरोग्यमंत्रालयाच्या आकडेवारीनुसार सोमवारी सकाळी आठपर्यंत देशात 33750 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले. तर, 10846 रुग्ण बरे झाले. 123 रुग्णांचा मृत्यू झाला. 27 डिसेंबरला देशात कोरोनाचे 6358 रुग्ण आढळले होते. त्यामुळे सहा दिवसांत कोरोना रुग्णसंख्येत सुमारे पाचपट वाढ झाली आहे.
आता ‘फ्लोरोना’चे संकट
कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रोनची जगभरात दहशत असतानाच आता ‘फ्लोरोना’चा रुग्ण आढळला आहे. इस्त्र्ााईलमध्ये एका गरोदर महिलेला ‘फ्लोरोना’ झाला आहे. ‘फ्लोरोना’ म्हणजे कोरोना आणि इन्फ्ल्यूएन्झाचा एकाचवेळी संसर्ग होते. हा कोरोनाचा नवा व्हेरिएंट नसल्याचे तज्ञाचे म्हणणे आहे.































































