इंग्लंडचा दमदार विजय, दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी

इंग्लंडच्या क्रिकेट संघाने सोमवारी श्रीलंकेला सात गडी राखून हरवत दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. पहिल्या डावात 228 धावा फटकावणाऱया जो रूट याची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली. वर्ल्ड चॅम्पियनशिपअंतर्गत ही मालिका होत आहे.

श्रीलंकेकडून मिळालेल्या 74 धावांचे सोपे आव्हान इंग्लंडने तीन गडी गमावत पार केले. जॉनी बेअरस्टोने 65 चेंडूंत दोन चौकारांसह नाबाद 35 धावा फटकावल्या. डॅन लॉरेन्सने नाबाद 21 धावांची खेळी साकारली. श्रीलंकेकडून इम्बुलदेनीया याने 29 धावा देत दोन फलंदाज बाद केले.

संक्षिप्त धावफलक

  • श्रीलंका – पहिला डाव सर्व बाद 135 धावा
  • इंग्लंड – पहिला डाव सर्व बाद 421 धावा
  • श्रीलंका – दुसरा डाव सर्व बाद 359 धावा
  • इंग्लंड – दुसरा डाव 3 बाद 76 धावा
आपली प्रतिक्रिया द्या