
अॅडलेड कसोटीत पराभवाला सामोरा गेलेला हिंदुस्थानचा क्रिकेट संघ 26 डिसेंबरपासून मेलबर्न येथे खेळवण्यात येणाऱया दुसऱया कसोटीसाठी सज्ज होतोय. अॅडलेड येथील ‘डे-नाईट’कसोटी गुलाबी चेंडूने खेळवण्यात आली होती. आता उर्वरित तीन कसोटी ‘दिवसा’ खेळवण्यात येणार असून या सर्व कसोटी लाल चेंडूने खेळवण्यात येणार आहेत. मेलबर्न येथील स्टेडियममध्ये मंगळवारी टीम इंडियाच्या क्रिकेटपटूंनी कसून सराव केला.
मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रीचा गुरुमंत्र
मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या गुरुमंत्राने हिंदुस्थानी खेळाडूंच्या सरावाला सुरुवात झाली. हिंदुस्थानी संघाला पहिल्या कसोटीत दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. कर्णधार विराट कोहलीही मायदेशी रवाना झाला आहे. त्यामुळे टीम इंडियाच्या इतर खेळाडूंमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी रवी शास्त्राr यांच्याकडून मोलाचे मार्गदर्शन मिळण्याची गरज आहे हेच त्यांनी सरावाच्या पहिल्या दिवशी केले.
राहुल, गिल, जाडेजाची प्रक्टिस
आयपीएलमध्ये शानदार कामगिरी करणारा लोकेश राहुल, युवा सलामीवीर शुभमन गिल व अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजा या तिघांनी मंगळवारी कसून सराव केला. लोकेश राहुल व शुभमन गिलने नेटमध्ये फलंदाजीचा सराव केला. रवींद्र जाडेजाने सौराष्ट्राचा त्याचा सहकारी चेतेश्वर पुजारासमोर गोलंदाजीची प्रॅक्टिस केली.
युवा वेगवान गोलंदाज होताहेत सज्ज
मोहम्मद शमीला दुखापतीमुळे या मालिकेमधून माघार घ्यावी लागलीय. त्यामुळे आता उर्वरित तीन कसोटींमध्ये युवा वेगवान गोलंदाजांना टीम इंडियाच्या अंतिम अकरामध्ये संधी देण्यात येईल यात शंका नाही. नवदीप सैनी, मोहम्मद सिराज व शार्दुल ठाकूर या गोलंदाजांनी मंगळवारी कर्णधार अजिंक्य रहाणेसमोर गोलंदाजीचा सराव केला.
साहाआधी पंतला संधी
अनुभवी यष्टिरक्षक रिद्धीमान साहा याला पहिल्या कसोटीत ठसा उमटवता आला नाही. त्यामुळे दुसऱया कसोटीत त्याच्या समावेशाबाबत प्रश्नचिन्ह आहे. रवी शास्त्राRनीही रिद्धीमान साहाआधी रिषभ पंतला नेटमध्ये फलंदाजीचा सराव करण्याची संधी दिली. त्याच्याशी रवी शास्त्री यांनी संवादही साधला हे विशेष.



























































