हिंदुस्थान-दक्षिण आफ्रिका अंतिम टी-20 आज

483

यजमान हिंदुस्थान व दक्षिण आफ्रिका यांच्यातील अंतिम टी-20 क्रिकेट सामना 22 सप्टेंबरला बंगळुरूमध्ये होणार आहे. मात्र या लढतीवर पावसाचे सावट असल्याचा अंदाज वेधशाळेने वर्तविल्यामुळे क्रिकेटशौकिनांची धाकधुक वाढली आहे. धरमशाला येथील सलामीचा सामना पावसात वाहून गेला होता. त्यानंतर मोहालीतील दुसरी लढत जिंकून हिंदुस्थानने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

मोहालीतील टी-20 लढतीत विराट कोहलीच्या ‘टीम इंडिया’ने दक्षिण आफ्रिकेला 149 धावसंख्येवर रोखले होते, मात्र 150 धावांचे विजयी लक्ष्य गाठण्यासाठी हिंदुस्थानला 19 व्या षटकांपर्यंत वाट पाहावी लागली होती. कर्णधार क्विंटॉन डिकॉक व तेम्बा बावुमा यांनी चांगली फलंदाजी केली होती. डेव्हिड मिलरचा दांडपट्टा चालला असता तर या लढतीचा निकाल वेगळाही लागू शकला असता. त्यामुळे तिसऱ्या व निर्णायक लढतीत पाहुणा संघ विराटच्या सेनेला कडवी लढत देण्याची शक्यता बळावली आहे.

थेट प्रक्षेपण

सायंकाळी 7 वाजता, स्टार स्पार्टस् वाहिनीवर

आपली प्रतिक्रिया द्या