IPL 2024 – सलामीचा सामना आणि योगायोग, ‘या’ संघाना असेल संधी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

IPL 2024 चे सामने 22 मार्चपासून सुरू होणार आहेत. सलामीचा सामना महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपरकिंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुमध्ये रंगणार आहे. बंळुरूच्या संघात विराट कोहली आहे. आयपीएलचा ओपनिंग म्हणजे सलामीचा सामना आणि विजेता संघ यांच्यात आतापर्यंत अनेक योगायोग जुळून आले आहेत. आतापर्यंत चेन्नई संघ पाचवेळा आयपीएल विजेता ठरलेला आहे. तसेच सलामीच्या सामन्यातील एक संघ अंतिम सामन्यात पोहचण्याचाही योगायोग आहे. त्यामुळे यावेळी चेन्नई सुपरकिंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे संघ विजेता ठरल्यास या योगाची पुनरावृत्ती होणार आहे.

आतापर्यंत बंगळुरू संघ 2009,2011,2016 मध्ये अंतिम सामन्यात पोहचला आहे. मात्र, विजेता बनण्याची त्यांची संधी हुकली. त्यामुळे यंदाच्या सलामीच्या सामन्यात विजय मिळवत अंतिम सामना गाठण्याचे त्यांचे ध्येय असेल. 2008 पासून आतापर्यंत आय़पीएलचे 16 पर्व झाले आहेत. त्यात पाचवेळा सलामीचा सामना खेळणाऱ्या संघापैकी एक संघ विजेता ठरला आहे. सलामीचा सामना जिंकणारा संघ तीनवेळा विजेता ठरला आहे. तर दोनवेळा सलामीचा सामना पराभूत होणार संघ विजेता ठरला आहे. त्यामुळे यंदाच्या आयपीएलमध्ये पाचवेळा झालेल्या योगाची पुनरावृत्ती होणार का, याची क्रिकेट रसिकांना उत्कंठा आहे.

आयपीएलमध्ये आतपर्यंत सर्वाधिकवेळा विजेतेपदाचा मान मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्याकडे आहे. मुंबई इंडियन्सने 2013, 2015, 2017, 2019, 2020 असे पाच वेळा तर चेन्नई सुपरकिंग्ज 2010, 2011, 2018, 2021, 2023 असे पाचवेळा विजेता ठरली आहे. तर कोलकाता नाइट रायडर्स 2012 आणि 2014 असे दोनदा विजेता ठरली आहे. तर सनराइजर्स हैदराबादने (डेक्कन चार्जर्स) संघाने दोनदा विजेदेपद पटकावले आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, दिल्ली कॅपिटल्स, पंजाब किंग्ज, लखनऊ सुपर जायंट्स हे संघ आतापर्यंत एकदाही विजेते ठरलेले नाहीत.