
आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आधी न्यूझीलंड संघाला जबरदस्त झटका बसला आहे. संघाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज डेव्हॉन कॉनवे याच्या उजव्या हाताला झालेल्या दुखापतीमुळे अंतिम सामन्यातून बाहेर पडला आहे. यासोबतच तो 17 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या हिंदुस्थानविरुद्धच्या दौऱ्यातही संघासोबत नसेल. इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य फेरीत आऊट झाल्यानंतर त्याने आपल्याच बॅटवर पंच मारल्याने त्याच्या हाताला दुखापत झाली होती.
याबाबत न्यूझीलंड क्रिकेट टीमच्या अधिकृत अकाऊंटवरून ट्विट करत लिहिण्यात आले आहे की, ”डेव्हॉन कॉनवे टी-20 विश्वचषक आणि हिंदुस्थान दौऱ्यातून बाहेर झाला आहे. इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात कॉनवेच्या हाताला दुखापत झाली आहे.” या ट्विट सोबतच न्यूझीलंड संघाचे मुख्य प्रशिक्षक गॅरी स्टेड यांचा एक व्हिडीओ देखील शेअर करण्यात आला आहे. ज्यात ते म्हणाले आहेत की, डेव्हॉन एक उत्कृष्ट टीम-मॅन आहे आणि संघाचा एक अतिशय लोकप्रिय सदस्य आहे, त्यामुळे आम्ही सर्व त्याच्याबद्दल भावना व्यक्त करतो. कॉनवे खूपच दुःखात असून त्याला असं वाटत आहे की त्याने संघाचा भ्रमनिरास केला. ते म्हणाले की, संघाला अंतिम सामन्यात कॉनवेची उणीव भासेल.
Devon Conway has been ruled out of the @T20WorldCup Final and following tour to India with a broken right hand. Conway sustained the injury when he struck his bat immediately after being dismissed in last night’s semi-final. More Info | https://t.co/LCMOTJqmqc #T20WorldCup pic.twitter.com/JIm9o6Rhxe
— BLACKCAPS (@BLACKCAPS) November 11, 2021
दरम्यान, आपल्या दुखापतीसाठी कॉनवे स्वतःच जबाबदार आहे. इंग्लंडविरुद्ध सेमीफायनल सामन्यात तो बाद झाल्यानंतर डावखुऱ्या त्याने आपल्याच हातावर बॅट मारली. स्कॅनमध्ये त्याच्या उजव्या हाताच्या पाचव्या मेटाकार्पलला दुखापत झाल्याची पुष्टी झाली आहे.





























































