वाढत्या लीगमुळे क्रिकेटपटूंचाच फायदा, वीरेंद्र सेहवागने केली फ्रेंचाइजी क्रिकेटची पाठराखण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जगभरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या फ्रेंचाइजी क्रिकेटमुळे क्रिकेटपटूंचे नुकसान नव्हे, तर उलट त्यांचा फायदाच होणार आहे. विशेष म्हणजे कुणी कितीही बोंबाबोंब करो, वाढत्या लीगमुळे हिंदुस्थानातील आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या लोकप्रियतेला जराही धक्का बसणार नसल्याचे स्पष्ट मत हिंदुस्थानचा माजी तडाखेबंद सलामीवीर वीरेंद्र सेहवागने व्यक्त केले.

सध्या जगभरात सर्वच क्रिकेट खेळणाऱया तसेच छोटय़ा छोटय़ा देशांमध्ये लीग क्रिकेट अर्थातच फ्रेंचाइजी क्रिकेटचे पीक पह्फावतेय. फ्रेंचाइजी क्रिकेटच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटला जबर नुकसान होणार असल्याची भीती क्रिकेट पंडितांनी वर्तवली आहे. तसेच माजी कसोटीपटू आणि प्रशिक्षक रवी शास्त्र्ााr यांनी एकदिवसीय क्रिकेटला आणखी वेगवान करण्यासाठी त्याचा 50 षटकांचा खेळ 40 षटकांवर आणावा, असे मत व्यक्त केले होते. याबाबत सेहवागला छेडले असता तो म्हणाला, फ्रेंचाइजी लीगची संख्या वाढल्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे नुकसान होणार नाही, असे माझे प्रामाणिक मत आहे. याउलट या लीगमुळे क्रिकेटमध्ये मोठय़ा संख्येने रोजगार उपलब्ध होईल. जास्तीत जास्त क्रिकेटपटूंना संधी मिळेल.

हिंदुस्थानी ज्येष्ठ क्रिकेटपटू मंडळाची ही लीग येत्या 22 ते 30 मार्चदरम्यान सहा लिजंड संघांमध्ये ही स्पर्धा होत असून एकूण 18 सामने खेळले जाणार आहेत. या लीगमध्ये क्रिकेट विश्वातील अनेक दिग्गज खेळणार आहेत. 22 मार्चला गुवाहाटी अॅवेंजर्स विरुद्ध इंदूर नाइट्स यांच्यात सलामीची लढत खेळली जाईल. या स्पर्धेत चंदिगड चॅम्प्स, नागपूर निंजाज, पाटणा वॉरिअर्स आणि विझाग टायटन्स या नावाने संघ खेळणार आहेत.