
दोन विविध ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या आहेत. अहमदपूर तालूक्यातील मौजे हडोळती येथे चोरट्यांनी भांड्याचे दुकान फोडले आणि दुकानातील रोख 3 लाख 50 हजार रुपये पळवले. तसेच अहमदपूर शहरातील एक ट्रॅव्हल्स बुकींगचे ऑफीस फोडून मोबाईल आणि साहित्य पळवण्यात आल्याची घटना घडली.
हडोळती येथे झालेल्या चोरी प्रकरणी खाजामियाँ मैनोद्दीन मनियार यांनी अहमदपूर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या दुकानाचे शटर उचकटून दुकानात प्रवेश केला. दुकानातील टेबलच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेले रोख 3 लाख 50 हजार रुपये चोरुन नेले. अज्ञात व्यक्तीविरुध्द पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.
अहमदपूर येथील चोरी प्रकरणी रामदास बालाजी मोरे यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, अज्ञात चोरट्यांनी फिर्यादीच्या ऑफीसचे शटर उचकटून ऑफिसमध्ये प्रवेश केला. दुकानातील दोन नोकिया कंपनीचे मोबाईल (किंमत 3 हजार रुपये) आणि एक सिसिटीव्ही डीव्हीआर (किंमत 4 हजार रुपये) चोरुन नेला. अज्ञात चोरट्यांविरुध्द पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.



























































