
मैदानावर फुटबॉल खेळताना झालेल्या वादावादीतून टोळक्याने दोघा तिघांना बेदम मारहाण करीत दगडफेक केली. ही घटना 25 ऑगस्टला सव्वा पाचच्या सुमारास येरवड्यातील सुधारगृहासमोरील मैदानावर घडली.
सौरभ शिवाजी वायदंडे वय 18 रा. हडपसर, शंकर अर्जुन जाधव (18) यांच्यासह पाच ते सहा अल्पवयीनांविरूद्ध येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणपत आसंगी वय 51 रा. येरवडा यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गणपत हे पंडीत जवारहलाल नेहरू उद्योग केंद्राचे काळजी वाहक आहेत. 25 ऑगस्टला त्यांनी मुलांना फुटबॉल खेळण्यासाठी मैदानावर सोडले होते. त्यावेळी मैदानावर असलेल्या सौरभ आणि शंकर यांच्यासह इतर आरोपींची मुलांसोबत वादावादी झाली. त्याच वादातून आरोपींनी मुलांना बेदम मारहाण केली. त्यांच्यावर दगडफेक करून दहशत निर्माण केली. सहायक पोलीस निरीक्षक गणेश कवतिके तपास करीत आहेत.





























































