हातपाय बांधून गुप्तांगात मिरची पावडर भरली, जावेने मुलासोबत मिळून केले भयंकर कृत्य

राजस्थानमध्ये एक संतापजनक घटना घडली आहे. एका मोठ्या जावेने लहान जावेसोबत क्रूरतेचा कळस गाठला आहे. घरात झालेल्या वादातून मोठ्या जावेने लहान जावेच्या घरात घुसून गुप्तांगात मिरची पावडर भरल्याची घटना घडली. एवढ्यावरच ती न थांबता तिने पॉलिथीन जाळून तिच्या शरीरावर डाग दिले आहेत. यावेळी मोठ्या जावेचा मुलानेही तिची साथ दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना जोधपूर जिल्ह्यातील बोरानाडा पोलीस स्टेशन परिसरातील आहे. नरनदी येथे पिडीत महिला राहत असून तिचा पती गोव्यात काम करतो आणि घरी दोन लहान मुले आहेत. महिलेची मोठी जाव तिच्या घरापासून हाकेच्या अंतरावर राहते. दोघींमध्ये काही कारणाने वाद सुरु होते. रविवारी सायंकाळी पिडीत महिला घरी एकटी असल्याची संधी साधून तिची मोठी जाऊ मुलासह तिच्या घरात घुसली. त्यांच्यामध्ये भांडण झाले आणि झालेल्या वादातून मोठ्या जावेने हात बांधले. त्यानंतर जावेच्या मुलासह दोघांनी महिलेला मारहाण करून तिच्या गुप्तांगामध्ये मिरची पावडर भरली. महिला वेदनेने किंचाळत होती, सोडण्याची विनंती करत होती मात्र तिच्या जावेला तिच्यावर दया आली नाही उलट तिने घरात ठेवलेले पॉलिथिन जाळून महिलेच्या अंगावर डाग दिले. भाजल्याने महिलेच्या अंगावर फोड आले. या घटनेनंतर नातेवाईकांनी महिलेला रुग्णालयात दाखल केले आणि पोलिसांना माहिती देण्यात आली.

पीडित महिलेच्या तक्रारीनंतर, पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. या संपूर्ण प्रकरणाचा तपास एसीपी बोरानाडा नरेंद्र सिंग देवरा करत आहेत. याप्रकरणी रविवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला असून महिलेचा जबाबही नोंदवण्यात आला आहे. महिलेला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.