
‘केटीएम’सारख्या हायफाय दुचाकी चोरून मनसोक्त जॉय रायडिंग करणारे दोघे तरुण गुन्हे शाखा युनिट-7 च्या हाती लागले आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीच्या तीन दुचाकी हस्तगत केल्या आहेत.
पवईच्या गौतमनगर परिसरात राहणारा मोहम्मद अखिल याने रामबाग येथे पार्क केलेली त्याची दुचाकी चोरीला गेल्याने पवई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. युनिट-7 च्या प्रभारी निरीक्षक प्रिया थोरात तसेच निरीक्षक सुधीर जाधव, एपीआय अमोघसिद्ध ओलेकर, उपनिरीक्षक माधवानंद धोत्रे, रामदास कदम व पथक या गुह्याचा समांतर तपास करत असताना भांडुप येथे दोन तरुण संशयास्पद फिरत असल्याची माहिती अंमलदार मोरे यांना मिळाली.
त्यानुसार पोलिसांनी अदनान खान (21) आणि नूर सय्यद (18) या दोघांना पकडले. चौकशीत त्यांनी गुह्याची कबुली दिल्यानंतर त्यांच्याकडून 2 लाख 60 हजार किमतीच्या तीन महागडय़ा दुचाकी हस्तगत केल्या. यामुळे पवई, मुलुंड आणि ठाण्यातल्या श्रीनगर पोलीस ठाण्यात दाखल दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आले. दोघेही जॉय रायडिंगसाठी गाडय़ा चोरायचे. त्यांनी चोरीची गाडी विकायचादेखील प्रयत्न केला होता. पोलीस अधिक तपास करीत आहेत.
























































