सावत्र काकाचा अल्पवयीन पुतणींवर लैंगिक अत्याचार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

घरात कोणी नसताना सावत्र काकाने दोघा अल्पवयीन पुतणींवर लैंगिक अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार शिवडीत घडल्याचे समोर आले आहे. शिवडी पोलिसांनी आरोपीला बेडय़ा ठोकल्या आहेत.

गेल्या आठवडय़ात शिवडी येथे एका स्वयंसेवी संस्थेच्या वतीने परिसरातील विद्यार्थिनी, तरुणींसाठी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यावेळी चांगला स्पर्श-वाईट स्पर्श याबाबत माहिती दिल्यानंतर पीडित 15 वर्षीय मुलीने तिच्यासोबत काकाकडून होत असलेल्या अत्याचाराबाबत स्वंयसेवी संस्थेच्या प्रतिनिधीला सांगितले. मग त्यांनी मुलीच्या पालकांना भेटून मुलीवर होत असलेल्या अत्याचाराची माहिती दिली.

तेव्हा त्या मुलीच्या 17 वर्षीय मोठय़ा बहिणीनेदेखील तिच्यावर होत असलेल्या अत्याचाराविरोधात आवाज उठवला. काका घरी कोणी नसताना लैंगिक शोषण करतो आणि कोणाला याबाबत सांगितले तर परिणाम वाईट होतील असे धमकावतो असे तिने सांगितले. त्यानंतर मुलींच्या पालकांनी शिवडी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. अखेर शिवडी पोलिसांनी बलात्कार, विनयभंग, ‘पोक्सो’अन्वये गुन्हा दाखल करून आरोपी जहांगीर (22) याला अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले.

क