चेंबूरमध्ये रिक्षाचालकाला लुटणाऱ्या तडीपाराला अटक

तडीपार असतानाही तो अन्य दोघा सहकाऱ्यांसह चेंबूर परिसरात आला. त्याने रिक्षाचालकाला एका गल्लीत नेऊन त्याला चाकूचा धाक दाखवत त्याच्याकडील रोकड व मोबाईल हिसकावून नेला. पण टिळकनगर पोलिसांनी अचूक तपास करीत त्याला नेरुळ पोलिसांच्या सहकार्याने पकडले.

चार तारखेच्या रात्री 11.30 वाजता चेंबूर पश्चिमेकडील पी.एल. लोखंडे मार्ग येथे तडीपार आरोपी सिद्धार्थ अवचार याने त्याच्या दोन साथीदारांसह रिक्षाचालकाला लुटले. याप्रकरणी रिक्षाचालक श्रीकृष्ण मदन साव याने दिलेल्या तक्रारीवरून टिळकनगर पोलिसांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि राहुल वाघमारे, शिंदे, भांड, पोमणे, भुवड, साटेलकर आणि भोसले यांच्या पथकाने सापळा रचून सिद्धार्थला ताब्यात घेतले.