
परिसरात दहशत माजविण्यासाठी पिस्तूल बाळगणाऱ्या सराईताला समर्थ पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून पिस्तूल आणि काडतुसे असा 30 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. अनिकेत उर्फ पावण्या ज्ञानेश्वर काळे (वय 22, रा.नाना पेठ ) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
समर्थ पोलीस हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना, क्वार्टर गेट गल्लीत एकजण कमरेला पिस्तुल बाळगून उभा असल्याची माहिती पोलीस हवालदार सुशील लोणकर, संतोष काळे, हेमंत पेरणे यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून अनिकेतला ताब्यात घेतले. त्याच्याकडून पिस्तुलासह काडतुसे जप्त करण्यात आली.
ही कामगिरी पोलीस उपायुक्त प्रियांका नारनवरे, सहायक पोलीस आयुक्त गजानन टोम्पे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे, पोलीस निरीक्षक उल्हास कदम, पोलीस उपनिरीक्षक विशाल मोहिते, संतोष काळे, सुशील लोणकर, सुभाष पिंगळे, हेमंत पेरणे, निलेश साबळे, सुमित खुट्टे, शुभम देसाई, सचिन पवार, सुभाष मोरे, श्याम सुर्यवंशी, विठ्ठल चोरमले, प्रशांत सरक यांच्या पथकाने केली.


























































