नगरमध्ये उडीद, मुगासाठी 12 कोटींचा पीकविमा

348

या हंगामात नगर तालुक्यात पडलेला अत्यल्प पाऊस व त्यामुळे करपून गेलेली पिके यामुळे खरीप उत्पादनात मोठी घट झाली आहे. सरकारने निश्‍चित केलेल्या उत्पादनापेक्षा 75 टक्क्यांपेक्षा जास्त घट दिसून आल्यामुळे विमा कंपनीने उडीद व मूग पिकांसाठी 12 कोटींचा पीकविमा मंजूर केला आहे. तालुक्यातील विमा भरलेल्या 51 हजार 778 शेतकर्‍यांना 12 कोटी रुपये विमा मंजूर झाला आहे.

ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टी व परतीच्या पावसाने तालुक्यात धुमाकूळ घातला. चार मंडळातील मूग व उडीद या दोन्ही पिकांचे मोठे नुकसान झाले. शेतकर्‍यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घतेला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना मदतीची नितांत गरज असल्याचे पाहून तालुका व जिल्हा प्रशासन कामाला लागले आहे. प्रशासनाने शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन पंचनामे केले. या नंतर 100 टक्के पिकांचे नुकसान झाल्याचा अहवाल राज्य सरकारला पाठविला. राज्य सरकार व राज्यपालांनीही शेतकर्‍यांना प्रती हेक्टर आठ हजारांची मदत घोषित केली. जामखेड तालुक्यात पीकविमा आणेवारी 50 टक्क्यांच्या आत करण्यात येऊन शेतकर्‍यांना पीकविमा मिळावा, अशी आग्रही मागणी आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. गेल्या हंगामात सोयाबीन, ज्वारी, तूर, बाजरी, उडीद, मूग या पिकाचा विमा शेतकर्‍यांनी भरला होता. यापैकी उडीद पिकासाठी 36853 हजार, तर मूग पिकासाठी 14 हजार 925 लाभार्थी होते. तालुक्यासाठी 12 कोटी 1 हजार 421 रुपये विमा मंजूर झाला असून तो ऑनलाइन शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा झाला आहे. पेरणीत शेतकरी बांधवांना या विम्यामुळे योग्य आधार मिळाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या