
पाकिस्तानसठी हेरगिरी केल्याप्रकरणी एनआयने केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) एका जवानाला अटक केली आहे. मोती राम जाट असे अटक केलेल्या जवानाचे नाव असून तो 2023 पासून पाकिस्तानला गोपनीय माहिती देत असल्याचा आरोप आहे. या घटनेमुळे देशभरात खळबळ उडाली आहे.
अटकेनंतर मोती राम जाटला दिल्लीतील पटियाला हाऊस येथील विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी एनआयएने पुढील चौकशीसाठी त्याच्या कोठडीची मागणी केली. न्यायालयाने ही विनंती मान्य करत त्याला 6 जूनपर्यंत एनआयए कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
मोती राम जाटला दिल्लीतून अटक करण्यात आली असून एनआयए त्याची सखोल चौकशी करत आहे. तपासकर्त्यांनी असा आरोप केला आहे की, मोती राम जाटला राष्ट्रीय सुरक्षेसंबंधित गोपनीय माहिती देण्यासाठी विविध मध्यस्थांमार्फत पैसे मिळत होते. एजन्सीला असा संशय आहे की, जाट 2023 पासून गोपनीय माहिती शेअर करत होता. तपास यंत्रणांशी समन्वय साधून जाट्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्यात आले. यानंतर अटक करण्यात आली. या काळात कोणत्या प्रकारची माहिती चोरीला गेली याचा तपास अधिकारी करत आहेत.