सीआरपीएफच्या वाहनाचा जम्मू-कश्मीरमध्ये भीषण अपघात, 5 जवानांसह 7 जण जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जम्मू-कश्मीरमध्ये श्रीनगर महामार्गावर आज सकाळी केंद्रीय राखीव पोलीस दलाचा (सीआरपीएफ) मिनी ट्रक आणि एका ट्रकमध्ये समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात सीआरपीएफच्या 5 जवानांसह 7 जण जखमी झाले असून ते सुदैवाने या अपघातातून बचावले.

पुलुगाम जिह्यात काझीगुंड परिसरात लेव्हडोरा येथे हा अपघात झाला. सीआरपीएफच्या मिनी ट्रकला समोरून येणाऱया ट्रकने जोरदार धडक दिली. या धडकेत सीआरपीएफचा मिनी ट्रक उलटला. या अपघातात सीआरपीएफचे चार अधिकारी, एक जवान आणि ट्रकचा चालक व वाहक जखमी झाले. पोलीस निरीक्षक राजकुमार तिवारी, राजेंद्र सिंह, सहायक पोलीस उपनिरीक्षक जी. डी. लवेंडे, उमेश कुमार, हेड काॅन्स्टेबल चालक वीरेंद्र अशी सीआरपीएफच्या जखमी पोलिसांची नावे आहेत.