
सामना ऑनलाईन,मुंबई
मुंबई क्षेपणास्त्र अवकाशात सोडायचे असेल तर त्यासाठी स्वतंत्र इंजिनाची आवश्यकता असते. या इंजिनाद्वारे क्षेपणास्त्र पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर नेऊन अवकाशात स्थिरावण्यात येते. हे इंजिन पाहण्याची संधी मुंबईकरांना मिळणार आहे. इस्रो या अंतराळ संशोधन संस्थेने हे क्रोयोजेनिक इंजिन मुंबईत आणले आहे. पवईच्या आयआयटी मुंबईमध्ये हे क्रोयोजेनिक इंजिन आज आणले गेले. हे इंजिन पाहण्याची आणि त्याचे वैशिष्टय जाणून घेण्याची संधी मुंबईकरांना मिळणार आहे. आयआयटी मुंबईत विज्ञानावर आधारीत संमेलनासाठी हे इंजिन इस्रोने आणले आहे. क्रोयोजेनिक इंजिनाद्वारे हजारो किलोची क्षेपणास्त्र अवकाशात सोडता येतात. चांद्रयान मोहीमेसाठीही इस्रोने विशेष क्रायोजेनिक इंजिनाची निर्मिती केली आहे.































































