ताडोबात वाघाच्या चार बछड्यांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फोटो-प्रातिनिधीक

ताडोबा बफर जंगलात चार वाघाच्या बछड्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. ताडोबाच्या बफर झोन मधील शिवनी वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या जंगलात चार बछडे मृत अवस्थेत आढळून आले. मोठ्या वाघाने त्यांच्यावर हल्ला करून त्यांना ठार केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. याबाबत वन विभागाने अद्याप अधिकृत माहिती दिलेली नाही. घटनेची माहिती मिळताच वन अधिकारी घटनास्थळी पोहचले आहेत. दोन दिवसांपूर्वी ताडोबा अभयारण्यातील बफर झोनमध्ये दोन वाघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. ही घटना ताजी असतानाच चार बछड्यांचा मृत्यू झाल्याने वन्यप्रेमींनी दुःख व्यक्त केले आहे.