अलिबागच्या कोळीवाडय़ात मुक्ता-सागरचं केळवण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या कित्येक दिवसांपासून ज्या लग्नाची प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे त्या मुक्ता-सागरचा विवाहसोहळा येत्या आठवडय़ात पार पडणार आहे. गोखले आणि कोळी कुटुंबाने लग्नाची जय्यत तयारी केली असून विवाहसोहळ्यात स्टार प्रवाह परिवारातले खास पाहुणेही येणार आहेत. अलिबागमधल्या कोळीवाडय़ात नुकताच मुक्ता-सागरचं केळवण पारंपरिक पद्धतीने पार पडलं. सोशल मीडिया स्टार नलिनी मुंबईकर यांनी मुक्ता, सागर, इंद्रा आणि चिमुकल्या सईला सुग्रास जेवणाची मेजवानी दिली. कलाकारांच्या स्वागतासाठी संपूर्ण कोळीवाडा सजला होता. कोळी गाण्यांच्या ठेक्यावर कलाकारांचं स्वागत झाले.