CWC201: बाबर आझमचे शतक, पाकिस्तानचे आव्हान कायम; न्यूझीलंडचा पहिला पराभव

209

सामना ऑनलाईन । बर्मिंघम

आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेत आतापर्यंत ‘अपराजीत’ राहिलेल्या न्यूझीलंड आणि ‘करो या मरो’ अवस्थेत आलेल्या पाकिस्तानमध्ये सामना रंगला. न्यूझीलंडने दिलेले 238 धावांचे आव्हान पाकिस्तानने 6 गडी राखत आरामात पार केले. पाकिस्तानच्या विजयात महत्वाचा वाटा उचलला तो बाबर आझम आणि हरिस सोहेल यांनी. बाबर आझमने नाबाद शतकी (101) खेळी केली, तर हरिसने अर्धशतक (68) ठोकले. या विजयासह पाकिस्तानने वर्ल्डकपमधील आव्हान कायम राखले असून न्यूझीलंडचा यंदाच्या वर्ल्डकपमधील हा पहिला पराभव आहे.

त्याआधी न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 6 बाद 237 धावा केल्या. पाच बाद 83 धावा अशा संकटात असलेल्या न्यूझीलंडचा डाव निशम (नाबाद 97 धावा) आणि ग्रँडहोमने (64 धावा) सावरला. दोघांनी अर्धशतक ठोकले आणि शतकी भागिदारी करत डाव 200 पार पोहोचवला. कर्णधार केन विलियम्सनने 41 धावांचे योगदान दिले. पाकिस्तानकडून शाहिन आफ्रिदीने सर्वाधिक 3 बळी घेतले.

 • बाबर आझमची शतकी खेळी
 • पाकिस्तान विजयाच्या उंबरठ्यावर, 18 चेंडूत 13 धावांची आवश्यकता
 • हरिस सोहेलचे अर्धशतक
 • पाकिस्तानच्या 200 धावा पूर्ण
 • 120 चेंडूत 110 धावांची आवश्यकता
 • 30 षटकानंतर पाकिस्तानच्या 3 बाद 128 धावा
 • बाबर आझमचे अर्धशतक

 • 150 चेंडूत 128 धावांची आवश्यकता
 • 25 षटकानंतर पाकिस्तानच्या 3 बाद 110 धावा
 • फर्ग्यूसनने 32 धावांवर केले बाद
 • पाकिस्तानला तिसरा धक्का, हाफिज बाद
 • पाकिस्तानच्या 100 धावा पूर्ण
 • 20 षटकानंतर पाकिस्तानच्या 2 बाद 86 धावा
 • बाबर आझम-मोहम्मद हाफिज जोडी जमली
 • 15 षटकानंतर पाकिस्तानच्या 2 बाद 64 धावा
 • पाकिस्तानच्या 50 धावा पूर्ण
 • इमान-उल-हक 19 धावांवर बाद
 • पाकिस्तानचा दुसरा धक्का

 • दहा षटकानंतर पाकिस्तानच्या 1 बाद 43 धावा
 • पाच षटकानंतर पाकिस्तानच्या 1 बाद 24 धावा
 • बोल्टने 9 धावांवर केले बाद
 • पाकिस्तानची खराब सुरुवात, फखर जमान स्वस्तात बाद

 • जेम्स निशमच्या नाबाद 97 धावा
 • न्यूझीलंडच्या 50 षटकात 6 बाद 237 धावा

आपली प्रतिक्रिया द्या