CWC2019 : ऑस्ट्रेलिया सेमिफायनलमध्ये दाखल, इंग्लंडचा पाय खोलात

150

सामना ऑनलाईन । लंडन

लॉर्डसच्या मैदानावर झालेल्या लढतीत ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा 64 धावांनी पराभव केला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने सेमिफायनल मध्ये प्रवेश केला. ऑस्ट्रेलियाकडून बेहनड्रॉफने सर्वाधिक 5 बळी घेतले, तर स्टार्कने 4 बळी घेत त्याला उत्तम साथ दिली. दरम्यान, या पराभवामुळे इंग्लंड पुढील आव्हान वाढले आहे.

इंग्लंडने नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. डेव्हिड वॉर्नर आणि अॅरॉन फिंच यांनी ऑस्ट्रेलियाला 100 धावांची सलामी दिली. वॉर्नर अर्धशतकानंतर 53 धावांवर बाद झाला. त्यानंतर फिंचने यंदाच्या वर्ल्डकपमधील दुसरे शतक ठोकले. शतकानंतर फिंचही आर्चरच्या गोलंदाजीवर बाद झाला. स्मिथने 38 आणि कॅरीने नाबाद 38 धावांचे योगदान दिले. इतर फलंदाज स्वस्तात बाद झाल्याने ऑस्ट्रेलियाचा संघ 50 षटकात 7 बाद 285 धावा करू शकला.

वाचा लाईव्ह अपडेट – 

 • इंग्लंड पराभवाच्या उंबरठ्यावर, आठ खेळाडू बाद
 • इंग्लंडच्या 200 धावा पूर्ण
 • 60 चेंडूत 95 धावांची आवश्यकता
 • 40 षटकानंतर इंग्लंडच्या 7 बाद 191 धावा
 • इंग्लंडला सातवा धक्का, मोईन अली बाद
 • इंग्लंडला सहावा धक्का, बेन स्टोक्स 89 धावांवर बाद

 • 35 षटकानंतर इंग्लंडच्या 5 बाद 160 धावा
 • इंग्लंडच्या 150 धावा पूर्ण
 • 120 चेंडूत विजयासाठी 157 धावांची आवश्यकता
 • 30 षटकानंतर इंग्लंडच्या 5 बाद 129 धावा
 • बटलर 25 धावांवर बाद
 • इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत

 • स्टोक्सचे अर्धशतक
 • 25 षटकानंतर इंग्लंडच्या 4 बाद 109 धावा
 • इंग्लंडच्या 100 धावा पूर्ण
 • 20 षटकानंतर इंग्लंडच्या 4 बाद 91 धावा
 • बटलर आणि स्टोक्सवर डाव सावरण्याची जबाबदारी

 • 15 षटकानंतर इंग्लंडच्या 4 बाद 57 धावा
 • बेअरस्टो 27 धावांवर माघारी
 • इंग्लंडच्या डावाला घसरण, चौथा खेळाडू बाद

 • इंग्लंडच्या 50 धावा पूर्ण
 • 10 षटकानंतर इंग्लंडच्या 3 बाद 39 धावा
 • स्टार्कने घेतला दुसरा बळी
 • इंग्लंडला तिसरा धक्का, कर्णधार मॉर्गन 4 धावांवर बाद

 • पाच षटकानंतर इंग्लंडच्या 2 बाद 21 धावा
 • विन्सपाठोपाठ रुट 8 धावांवर बाद
 • इंग्लंडला मोठा धक्का

 • दोन षटकानंतर बिनबाद 11 धावा
 • जेसन बेहरड्रॉफने दुसऱ्याच चेंडूवर घेतली विकेट
 • इंग्लंडची खराब सुरुवात, विन्स शून्यावर बाद

 • ऑस्ट्रेलियाच्या 50 षटकात 7 बाद 285 धावा
 • ऑस्ट्रेलियाला सातवा धक्का, कमिन्स बाद
 • ऑस्ट्रेलियाला सहावा धक्का, स्मिथ बाद

 • ऑस्ट्रेलियाच्या 250 धावा पूर्ण
 • 45 षटकानंतर ऑस्ट्रेलियाच्या 5 बाद 248 धावा
 • स्टॉयनिस विचित्र पद्धतीने धावबाद
 • ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ तंबूत

 • 40 षटकानंतर 4 बाद 215 धावा
 • ऑस्ट्रेलियाला चौथा धक्का, मॅक्सवेल बाद
 • ऑस्ट्रेलियाच्या 200 धावा पूर्ण
 • ऑस्ट्रेलियाला तिसरा धक्का, शतकानंतर फिंच बाद
 • 115 चेंडूत 11 चौकार आणि 2 षटकारांसह शतकाला गवसणी
 • अॅरॉन फिंचचे वर्ल्डकपमधील दुसरे शतक

 • 35 षटकानंतर ऑस्ट्रेलियाच्या 2 बाद 183 धावा
 • स्टोक्सने 23 धावांवर ख्वाजाला केले बाद
 • ऑस्ट्रेलियाला दुसरा धक्का, ख्वाजा बाद

 • 30 षटकानंतर 1 बाद 162 धावा
 • ऑस्ट्रेलियाच्या 150 धावा पूर्ण
 • 25 षटकानंतर ऑस्ट्रेलियाच्या 1 बाद 138 धावा
 • मोईन अलीने वॉर्नरला 53 धावांवर केले बाद
 • ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का, वॉर्नर बाद

 • 20 षटकानंतर बिनबाद 110 धावा
 • फिंचपाठोपाठ वॉर्नरचे अर्धशतक
 • अॅरॉन फिंचचे अर्धशतक

 • ऑस्ट्रेलियाची दणदणीत सुरुवात, बिनबाद 100 धावा
 • 15 षटकानंतर ऑस्ट्रेलियाच्या बिनबाद 75 धावा

 • ऑस्ट्रेलियाच्या 50 धावा पूर्ण
 • 10 षटकात बिनबाद 44 धावा
 • पाच षटकानंतर ऑस्ट्रेलियाच्या बिनबाद 23 धावा
 • ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या तीन षटकात बिनबाद 13 धावा
 • वॉर्नर-फिंच ही सलामीची जोडी मैदानात
 • इंग्लंडने नाणेफेक जिंकली, प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय

 • थोड्याच वेळात होणार नाणेफेक
 • इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघात सामना

आपली प्रतिक्रिया द्या