पोलिसांनी वाचवले 3.70 कोटी रुपये

शेअर मार्केटच्या नावाखाली महिलेची फसवणूक करू पाहणाऱया सायबर ठगांना मुंबई पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने चांगलाच दणका दिला आहे. पोलिसांनी वेळेत कारवाई करून 3.70 कोटी रुपये वाचवले.

तक्रारदार महिलेला ठगाने त्याना इंस्टाग्रामवर शेअर मार्पेटमध्ये गुंतवणुकीबाबत जाहिरात पाठवली. त्या जाहिरातीखाली एक लिंक होती. ठगाने महिलेला जास्त नफ्याचे आमिष दाखवून पैसे गुंतवण्यास सांगितले. त्यावर विश्वास ठेवून महिलेने 4 कोटी 56 लाख रुपये बँक खात्यात ट्रान्स्फर केले. गुंतवणूक केल्यावर महिलेने ते पैसे काढण्याचा प्रयत्न केला. तेव्हा फसवणुकीचा प्रकार समोर आला. फसवणूक झाल्याचे महिलेच्या लक्षात आले. महिलेने सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी वेळेत कारवाई करून महिलेचे पैसे वाचवले आहेत.

हेल्पलाईनवर तक्रारींचा पाऊस
नागरिकांची सायबर फसवणूक झाल्यावर त्यांनी 1930 या हेल्पलाईनवर संपर्क करावा. या हेल्पलाईनवर दिवसाला एक हजार फोन येत असतात. गेल्या वर्षात त्या हेल्पलाईनवर सुमारे एक लाख 9 हजार फोन आल्याची नोंद आहे. गेल्या वर्षात पोलिसांनी एकूण 26 कोटी 48 रुपये वाचवले आहेत.

मुलाच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला
अल्पवयीन मुलाच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकल्याने मुलगा भाजल्याची घटना घाटकोपर येथे घडली. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली असून त्या मुलाला राजावाडी रुग्णालयात दाखल केले आहे. पीडित मुलगा मित्रांसोबत खेळत होता.अटकेत असलेल्या तिघांपैकी एकाकडे ज्वलनशील पदार्थ होता. एका आरोपीने त्या मुलाला जवळ बोलावून त्याच्या शर्टाच्या कॉलरवर ज्वलनशील पदार्थ टाकला. तर दुसऱया आरोपीने माचीसची काडी पेटवली. एका भाजीविव्रेत्या महिलेने प्रसंगावधान दाखवून शर्ट फाडल्याने आग विझली. या प्रकरणी मुलाच्या वडिलांनी घाटकोपर पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी तिघांना अटक केली. काही दिवसांपूर्वी अंधेरी परिसरातदेखील अशाच प्रकारची घटना घडली होती.