टेम्पोच्या धडकेत सायकलस्वार जागीच ठार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

सामना प्रतिनिधी । ढोकी

भरधाव टेम्पोने सायकलस्वारास धडक दिल्याने सायकलस्वार जागीच ठार झाल्याची घटना शनिवारी दुपारी १ च्या सुमारास घडली.

ढोकी येथील कुंडलिक देविदास ढवारे (६२) हे ढोकी गावाकडून स्वतःच्या शेताकडे जात होते. यावेळी ढोकी ते तडवळा रस्त्यावर जगदंबा मंदीराजवळ बार्शीकडून लातूरकडे जाणाऱ्या टेम्पोने समोरुन सायकलवरून येणाऱ्या कुंडलिक देविदास ढवारे यांना जोराची धडक दिली. यामध्ये ढवारे यांच्या डोक्याची कवटी फुटली तसेच पायावरुन टेम्पोचे चाक गेल्याने त्यंचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर टँम्पोचा चालक पळून गेला आहे. याप्रकरणी टँम्पो चालकाविरुध्द ढोकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.