
बदलापूरमध्ये अग्निरोधक सिलिंडरचा स्फोट झाला आहे. या स्फोटात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला आहे.
बदालपूरच्या मांजर्ली भागात अग्निरोधक सिलिंडरमध्ये नायट्रोजन भरत असताना स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की त्यात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक व्यक्ती जखमी झाला आहे. जखमी व्यक्तीला जवळच्या इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.



























































