
कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार उद्या बंगळुरू येथे होणाऱ्या भव्य सोहळ्यात मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. काँग्रेस हायकमांडने राज्यातील सर्व प्रादेशिक आणि सामाजिक समीकरणांच्या आधारे नवीन टीमची निवड केली आहे. त्यात जी. परमेश्वर उपमुख्यमंत्री तर पॅबिनेट मंत्री म्हणून यतींद्र, के.एच. मुनियप्पा, यु. टी. खादर, के.जे. जॉर्ज, कृष्णा गौडा, एम.बी. पाटील, पिऱयांक खर्गे, सतीश जारकीहोळी, रामलिंगा रेड्डी, दिनेश गुंडू राव, बायराथी सुरेश, ईश्वर खांद्रे हे मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.

























































