प्रदर्शनापूर्वीच ‘दबंग 3’ने कमवले 155 कोटी

2681

अभिनेता सलमान खानचा ‘दबंग 3’ लवकरच प्रदर्शित होणार आहे. अलिकडेच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. तेव्हापासूनच चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत. प्रदर्शनापूर्वीच चित्रपटाने कमाई सुरू केली आहे. ऍमेझॉन प्राईमला ऑनलाईन स्ट्रीमिंग आणि टी सीरिजला चित्रपटातील संगीताचे हक्क विकून ‘दबंग’ने तब्बल 155 कोटी रुपये मिळवले आहेत. सलमानची लोकप्रियता पाहाता ‘दबंग 3’ हा 2019 मधील सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट ठरेल असे म्हटले जात आहे. सलमान स्वतःच या चित्रपटाचा निर्माता आहे. मराठी सुपरस्टार महेश मांजरेकर यांची मुलगी सई मांजरेकर या चित्रपटात काम करीत आहे. सलमानने भाऊ अरबाज खानच्या मदतीने ‘दबंग 3’ची निर्मिती केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या