रॉकस्टार माही

सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवरील ‘दबंगी मुलगी आई रे आई’ मालिकेने प्रेक्षकांना खिळवून ठेवले आहे. आर्या (माही भद्रा) या दबंग मुलीभोवती या मालिकेचे कथानक फिरते. आपल्या वडिलांना शोधून काढण्याच्या प्रवासाला ती निघालेली आहे. आपले वडील हे सुपरकॉप असल्याचे आर्याला वाटत असते. प्रत्यक्षात सत्तेसाठी कुठल्याही थराला जाण्याची तयारी असलेल्या सत्या या गँगस्टरची ती कन्या आहेत. वास्तवापासून आर्या खूप दूर आहे.

चिमुकली कलाकार माही भद्रा आणि मानव गोहिल यांची सुंदर मैत्री या मालिकेत पहावयास मिळते. याबद्दल मानव सांगतो, ‘आमची रॉकस्टार माही ही खूप गुणी अभिनेत्री आहे. ती खरोखरच आमची दबंगी आहे. शूटींग तिला खूप आवडतं. प्रत्येक दृश्य ती अचूकपणे साकारते. निरागसपणामुळे तिची व्यक्तिरेखा खूप जिवंत भासते. खरं सांगायचं तर लहान मुलांकडून मोठयांनाही खूप शिकायला मिळतं. मीही एका मुलीचा बाबा आहे ’