दादर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार!

12

सामना ऑनलाईन, मुंबई

लोकल प्रकाशांची सर्वाधिक गर्दी होणाऱया दादर रेल्के स्थानकाचा कायापालट करण्यासाठी आराखडा तयार करण्यात आला असून रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी या आराखडय़ाला तत्वत: मंजुरी दिल्याची माहिती शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी आज दिली. पश्चिम रेल्वेच्या मुख्यालयात सोमवारी मुंबईतील खासदारांची एक बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर ही माहिती त्यांनी प्रसारमाध्यमांना दिली. या बैठकीला खासदार अरविंद सावंत, गजानन कीर्तिकर, राजन विचारे, गोपाळ शेट्टी, नाना पाटील, राजेंद्र गावित, पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक ए. के. गुप्ता आदी उपस्थित होते.

मुंबईतील इतरही रेल्वे स्थानकांचा कायापालट करण्यासाठी कॉर्पोरेट क्षेत्रातील कंपन्यांकडून सामाजिक दायित्व निधी (सीएसआर फंड) वापरता येऊ शकतो.  मात्र यासाठी रेल्वे प्रशासनाने जलद गतीने पावले उचलायला हवीत, असे शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी यावेळी स्पष्ट केले.

याप्रसंगी माटुंग्याच्या कमला रामन नगरातील झोपडपट्टय़ांमध्ये राहणाऱया सुमारे 500 कुटुंबांना रेल्वेने दिलासा द्यावा, अंतिम धोरण ठरेपर्यंत इथे कोणत्याही प्रकारची अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई करू नये. कच्छ प्रवासी संघटनेच्या मागणीनुसार कच्छ एक्सप्रेसचा शेवटचा थांबा दादर टर्मिनसपर्यंत करावा, तसेच गरीब रथच्या फेऱ्या आठवडय़ातून दोन कराव्यात, डहाणू लोकलला माहीम येथे थांबा द्यावा. रेल्वे स्थानकांकरील ‘1 रुपया क्लिनिक’ पुन्हा सुरू करावीत अशा मागण्या करण्यात आल्या.

आपली प्रतिक्रिया द्या