Daily Horoscope – कसा असेल तुमच्यासाठी आजचा दिवस ? वाचा ’26 डिसेंबर’चे राशीभविष्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मेष (ARIES – Monday, December 26, 2022)
निरंतर प्रयत्नांमुळे यशप्राप्ती होईल. जवळच्या नातेवाईकाकडे जाणे होईल. आर्थिक परिस्थितीत सुधारणा होण्याची शक्यता आहे. जोडीदाराच्या आळशीपणाचा तुमच्या कामावर परिणाम होण्याची शक्यता आहे. कामात संधीचा फायदा घ्या. कामात मानसिक दबाव येऊ शकतो. प्रत्येक चांगल्या-वाईट प्रसंगात शिकण्याच्या भूमिकेत राहा. एकांत आवडते पुस्तक वाचण्यासाठी वेळ काढाल.
शुभरंग : केशरी

वृषभ (TAURUS – Monday, December 26, 2022)
आरोग्य चांगले राहिल. कोणत्याही प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी सावध राहा. इतरांचे लक्ष वेधून घेण्यासाठी फारसे प्रयत्न करावे लागणार नाही. रोचक मासिक वाचावेसे वाटेल. भाऊ-बहिणींसोबत फिरायला जाण्याचा प्लान आखाल. नात्यांची जपणूक कराल. हिरव्या रंगाचा पोषाख परिधान करा. आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असेल.
शुभरंग : हिरवा

मिथुन (GEMINI – Monday, December 26, 2022)
पैसे कमवण्यासाठी नाविन्यपूर्ण संकल्पनांचा वापर करा. आनंदी राहण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. आरोग्याची काळजी घ्या. आवडते काम करण्यात यशस्वी व्हाल. जोडीदाराच्या उद्धट वागण्याचा त्रास होईल. स्वत:साठी वेळ काढा. घरातील लहान मुलांसाठी वेळ काढा. आवडते संगीत ऐका. कलेतील कौशल्य वाढीस लागेल. तुळशीला सकाळी पाणी घाला.
शुभरंग : नारिंगी

कर्क (CANCER – Monday, December 26, 2022)
कुलदेवतेची पूजा करा. प्रवासाचा आनंद घ्याल. प्रियकराला त्याची आवडती भेटवस्तू द्या. हातचे सोडून पळत्याच्या पाठी लागू नका. काळभैरव स्तोत्र वाचा. कोणासोबतही वादविवाद करू नका. प्रवासात मौल्यवान वस्तू सांभाळा. घरातील चिनीमातीच्या फुलदाणीत गुलाबाची फुले ठेवा. सायंकाळी बागेत फिरायला जा. आवडत्या फुलझाडांची लागवड करा.
शुभरंग : आकाशी

सिंह (LEO – Monday, December 26, 2022)
कोणत्याही कामानिमित्त घराबाहेर जाताना घरातील मोठ्यांचे आशीर्वाद घ्या. मित्रांचा आधार मिळेल. पैशाची बचत करा. भावंडांची तुमच्या कामात मदत होईल. आळस झटकून कामाला लागा. योग्य व्यक्तिकडूनच सल्ला घ्या. सकाळी लवकर उठण्याची सवय लावून घ्या. केसात मोगऱ्याचा गजरा घाला. मन प्रसन्न राहिल, अशी कामे करा.
शुभरंग : सोनेरी

कन्या (VIRGO – Monday, December 26, 2022)
घराच्या अंगणात गुलाबाच्या फुलांचे झाड लावा. तंदुरुस्ती आणि वजन घटवण्याकरिता प्रयत्न करावे लागतील. शारीरिक मेहनतीची कामे करण्यात वेळ जाईल. आजची सायंकाळ सुखद आणि अनोखी असेल. घरी नातेवाईक येतील. जोडीदाराच्या तब्येतीकडे लक्ष द्याल. चिंता दूर करण्यासाठी घरच्यांसोबत गप्पा मारा. घरातील वातावरण सकारात्मक असेल. अतिभावूक होऊ नका.
शुभरंग : राखाडी

तूळ (TULA – Monday, December 26, 2022)
स्त्रियांचा आदर करा. मुलांसाठी वेळ काढाल. कर्जातून मुक्त व्हाल. मनातील गुपित योग्य व्यक्तिकडेच बोला. आयुष्यातील महत्त्वाचे क्षण वाया घालवू नका. दारात रांगोळी काढा. तांब्याच्या भांड्यातील पाणी प्या. पारिजातकाच्या झाडला तांदळाचे दोन दाणे आणि साखरेचे दोन दाणे घालून मनातील इच्छा व्यक्त करा. आवडत्या रंगाचा पोषाख परिधान करा.
शुभरंग : सोनेरी

वृश्चिक ( SCORPIO – Monday, December 26, 2022)
बोलताना समजून उमजून बोला. करियरमध्ये प्रगतीच्या संधी चालून येण्याची शक्यता आहे. मनातील चिंता दूर होतील. आर्थिकदृष्ट्या आजचा दिवस लाभदायक आहे. आहारातील पथ्ये सांभाळा. मारुती स्तोत्र म्हणा. व्यसन टाळा. विश्रांती घेण्यासाठी वेळ द्यावा लागेल. टीव्ही किंवा मोबाईल पाहण्यात वेळ घालवाल. रात्रीचे जेवण वेळच्या वेळी घ्या.
शुभरंग : केशरी

धनु (SAGITTARIUS – Monday, December 26, 2022)
समाजात मानसन्मान वाढेल. नात्यातील मधुरता वाढेल. अहंकार दूर ठेवा. मित्रांच्या भरवशावर राहू नका. आरोग्याची काळजी घ्या. गरिबांना अन्नदान करा. नवे मैत्र लाभेल. नवीन पोषाख परिधान करा. रात्री कार्यालयातून लवकर घरी जाल. प्रवास जपून करा. घरात एखाद्या छोट्याशा समारंभाचे आयोजन कराल. मित्रमैत्रिणींसोबत वेळ घालवाल.
शुभरंग : चिंतामणी

मकर ( CAPRICORN – Monday, December 26, 2022)
देवळात प्रसाद वाटा. मानसन्मान मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. निर्णय घ्यायला वेळ लावू नका. दूरच्या नातेवाईकाकडून चांगली बातमी कानी पडण्याची शक्यता आहे. थोडेसे बासमती तांदूळ आणि चांदी लॉकरमध्ये ठेवा. तुमची देण्याची म्हणजे अप्रत्यक्ष मदत करण्याच्या वृत्तीचा फायदा होईल. घरात उत्साहाचं वातावरण असेल. परगावी प्रवास आरामदायी असेल. केवळ बघ्याची भूमिका न बजावता कार्यक्रमात सहभागी व्हाल. नवीन ओळखी होतील.
शुभरंग : निळा

कुंभ (AQUARIUS – Monday, December 26, 2022)
प्रेयसीला लाल रंगाचा पोषाख भेट म्हणून द्या. आरोग्याची काळजी घ्या. दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करा. गरजेच्या वेळी नातेवाईकांकडून मदत मिळेल. दिवस चांगला आहे. स्वत:साठी वेळ काढाल. जोडीदाराकडून कौतुकाचा वर्षाव होईल. महत्त्त्वाच्या कामासाठी रजा काढाल. आराध्यदेवतेच्या दर्शनाला जाल.
शुभरंग : नारिंगी

मीन (PISCES – Monday, December 26, 2022)
करियरमध्ये प्रगती कराल. अतिबोलू नका. मित्रांवर संशय घेऊ नका. कोणालाही पैसे उधार देऊ नका. पैसे परत मिळतील याची खात्री देता येत नही. धार्मिक पुस्तकांचे वाचन करण्यात वेळ घालवा. अनपेक्षितपणे नातेवाईक घरी येण्याची शक्यता आहे. नवीन ओळखी होतील. प्रिय व्यक्तिकडून भेटवस्तू मिळेल. घरात नवीन शोभेची वस्तू आणा. लोकं तुमचे कौतुक करतील.
शुभरंग : राखाडी