Daily Horoscope – कसा असेल तुमच्यासाठी आजचा दिवस ? वाचा ‘5 ऑगस्ट’चे राशीभविष्य

 

मेष (ARIES – Friday, August 5, 2022)
आत्मविश्वास कायम राखा. नियमित व्यायाम करण्याची सवय लावून घ्या. विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे दुर्लक्ष करू नये. व्यवसायात प्रगती होईल. मोठे प्रकल्प हाती घ्याल. विविध प्रकारच्या जबाबदाऱ्या स्वीकारण्याची तयारी ठेवावी लागेल.
शुभरंग : मोरपिसी

वृषभ (TAURUS – Friday, August 5, 2022)
दिलेली आश्वासने पाळाल. ऐकीव बातमीवर विश्वास ठेवू नका. एकाग्रता वाढवण्याचा प्रयत्न कराल. आत्मविश्वास वाढेल. आवडता पोषाख परिधान करा. मित्रांच्या भेटीगाठी होतील.
शुभरंग : हिरवा

मिथुन (GEMINI – Friday, August 5, 2022)
प्रवासाचे नियोजन कराल. आनंदाची बातमी कळेल. कोणाच्याही प्रभावाखाली आर्थिक व्यवहार करू नका. घरात सुशोभिकरणाचे काम कराल. पटकन रागावू नका. तडजोड करावी लागेल.
शुभरंग : जांभळा

कर्क (CANCER – Friday, August 5, 2022)
आपल्या निर्णयावर ठाम राहा. सकारात्मक विचारांना प्राधान्य द्या. आपले मत चुकीच्या दिशेने चालू राहणार नाहीत, याची काळजी घ्या. द्विधा मन:स्थितीत राहू नका. मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या. मनावस संयम ठेवून कामे करा.
शुभरंग : निळा

सिंह (LEO – Friday, August 5, 2022)
प्रलोभनांपासून दूर राहा. परदेशगमनाचे योग आहेत. विद्यार्थ्यांना मेहनत घ्यावी लागेल. खेळाकडे जास्त लक्ष द्या. स्वत:ला सिद्ध करा. कुटुंबातील वातावरण आनंदी ठेवण्याचा प्रयत्न कराल. इतरांच्या कामात ढवळाढवळ करू नका.
शुभरंग : राखाडी

कन्या (VIRGO – Friday, August 5, 2022)
कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करू नका. वाढणारा खर्च कमी करा. सुसंवाद साधाल. वरिष्ठांशी मर्जी राखाल. सर्व गोष्टी सावधतेनेच करा. मनाजोगी खरेदी करायला वेळ मिळेल.
शुभरंग : लाल

तूळ (TULA- Friday, August 5, 2022)
तुमचा सल्ला इतरांना फायद्याचा ठरेल. नाती टिकवण्यासाठी बोलण्यावर संयम ठेवावा लागेल. आरोग्य संवर्धनासाठी व्यायामाला प्राधान्य द्या. प्राणायाम करा. एकमेकांविषयी प्रेमभाव जागृत करा. विवाहाचा निर्णय सावधपणे घ्यावा लागेल.
शुभरंग : आकाशी

वृश्चिक ( SCORPIO – Friday, August 5, 2022)
आपले तेच खरे करू नका. आकलन शक्तीचा विकास करा. सकस आहार घ्या. सकाळी लवकर उठून चालण्याचा व्यायाम करा. कोणतेही निर्णय आज घाईघाने घेऊ नका. मनात आलेली निराशेची जळमटे दूर करा.
शुभरंग : जांभळा

धनु (SAGITTARIUS – Friday, August 5, 2022)
प्रेमात दक्षता ठेवावी लागेल. विद्यार्थ्यांना मेहनत घ्यावी लागेल. घरातील मतभेद कमी करण्याचा प्रयत्न करा. नव्या उपक्रमांना चालना मिळेल. मिळणाऱ्या संधीचा लाभ घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न कराल.
शुभरंग : पांढरा

मकर (CAPRICORN – Friday, August 5, 2022)
झेपतील तेवढ्याच जबाबदाऱ्या घ्याव्या. विचार कृतीत आणाल. अचानक होणाऱ्या बदलांची दखल घ्यावी लागेल. नको ते धाडस करू नका. विद्यार्थ्यांनी कसून अभ्यास करावा. ताणतणाव कमी करण्याचा प्रयत्न करा.
शुभरंग : लाल

कुंभ (AQUARIUS – Friday, August 5, 2022)
मनाची एकाग्रता साधण्याचा प्रयत्न करा. इतरांचे ऐकून घेण्याची तयारी ठेवा. झपाटून काम करण्याची क्षमता अंगी बाणा. लोकांचे दोष बघत राहू नका. जोडीदाराला समजू घ्या.
शुभरंग : चंदेरी

मीन (PISCES – Friday, August 5, 2022)
सामाजिक कर्तव्ये पार पाडाल. स्वत:चे म्हणणे इतरांवर लादू नका. कोणतेही काम करताना सावधगिरी बाळगा. वाहन काळजीपूर्वक चालवावे. आरोग्य उत्तम राहील. लॉटरी, जुगार इत्यादीमध्ये पैसा लावू नका.
शुभरंग : सोनेरी