दलाई लामांकडून कॅन्टबरीच्या पहिल्या महिला आर्चबिशपचे अभिनंदन

तिबेटी लोकांचे सर्वोच्च आध्यात्मिक नेते दलाई लामा यांनी लंडनच्या बिशप डेम सारा मुल्लाल्ली यांची कॅन्टरबरीच्या पुढील आर्चबिशप म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे. अँग्लिकन चर्चमधील हे सर्वोच्च पद आहे. अभिनंदन पत्रात, दलाई लामा यांनी डेम सारा मुल्लाल्ली यांची नियुक्ती ‘आशेचा किरण’ असल्याचे म्हटले आहे. डेम सारा मुल्लाल्ली यांना लिहिलेल्या पत्रात दलाई लामा यांनी सध्याच्या जागतिक आव्हानांबद्दल चिंता व्यक्त केली. त्यांनी लिहिले की, ‘आज जग अनेक अडचणींना तोंड देत आहे. हा असा काळ आहे जेव्हा मूलभूत मानवी मूल्यांना आव्हान दिले जात आहे.’