
एखादे गाणे ट्रेंड झाले की, त्या गाण्यावर एकापेक्षा एक रील तयार होतात. आपला रील एकदम हटके कसा होईल, याकडे सगळ्यांचा कल असतो. गेल्या काही दिवसांपासून संजू राठोडचे ‘एक नंबर तुझी कंबर’ हे गाणे सोशल मीडियावर धुमाकूळ घालतंय. त्यावरचा वेगळा रील सध्या चांगला व्हायरल होतोय. नर्तिका आणि नृत्यदिग्दर्शिका अनुराधा अय्यंगार यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये भरतनाटय़म ग्रुपमधील सहा महिलांनी ‘एक नंबर तुझी कंबर’ गाण्यावर एक अनोखा डान्स सादर केला आहे. ज्यामध्ये भरतनाटय़मचे उत्तम सादरीकरण आणि फ्रीस्टाइल डान्स स्टेप्सचे उत्तम मिश्रण आहे. पारंपरिक आणि वेस्टर्न डान्स स्टाइल नेटिजन्सला भावतेय. ‘एक नंबर तुझी कंबर’ गाण्याला दिलेला भरतनाटय़मचा पारंपरिक टच व्हायरल होतोय.