मला या दलदलीतून बाहेर काढा, दिनेश कानेरियाची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पाकिस्तान क्रिकेटसंघात हिंदू खेळाडू दानिश कानेरिया याला तुच्छ वागणूक दिली जायची असे समोर आल्यानंतर आता दानिशने त्याला दलदलीतून बाहेर काढा, अशी मागणी केली आहे. दानिशने त्याच्या आयुष्यात खूप अडचणी असून कुणीतरी मला मदत करा अशी याचनाच केली आहे. त्याने पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना देखील मदत करा असे आवाहन केले आहे.

दानिश इंग्लिश क्लब एसेस्क्ससाठी कांऊंटी क्रिकेट खेळत असताना स्पॉट फिक्सिंग प्रकरणी दोषी ठरवले होते. त्यानंतर त्याच्यावर बंदी घालण्यात आली आहे. तेव्हापासून दानिश हा क्रिकेटपासून दूर आहे. याविषयी बोलताना दानिश म्हणाला ‘माझं आयुष्य सध्या फार खराब परिस्थितीत आहे. मी पाकिस्तानातील अनेक दिग्गज नेत्यांना माझी मदत करण्याचे मला या अडचणीतून बाहेर काढा अशी विनवणी केली. मात्र कुणीच माझ्या मदतीला आले नाही. माझ्यासारखीच परिस्थिती असलेल्या अनेक खेळाडूंना मदत केली गेली. मात्र मला कुणीही मदत केली नाही. मी देखील देशासाठी खेळलो आहे. मला आता पाकिस्तानातील खेळाडूंचा व आपल्या पंतप्रधांनांचा पाठिंबा हवा आहे. मला या दलदलीतून बाहेर काढा. कृपया मला मदत करा’, अशी मागणी दानिशने केली आहे.