
आयुष्याच्या प्रत्येक टफ्यावर आपली भूमिका योग्य पद्धतीने साकारणाऱ्या आपल्या आई, बहीण, पत्नी, मुलगी, मैत्रिण, शिक्षिका इत्यादींप्रती आभार व्यक्त करण्यासाठी आणि त्यांचा गौरव, सन्मान करण्यासाठी दापोली सायकलिंग क्लबतर्फे आज सायकल फेरी काढण्यात आली. दापोलीच्या जडण घडणीमध्ये महत्वाचे योगदान दिलेल्या अनेक महिला या सायकल फेरीमध्ये सहभागी झाल्या होत्या.
या सायकल फेरीचा मार्ग दापोली शहरातील आझाद मैदान , दापोली उपजिल्हा रुग्णालय, एस्.टी. आगार, पोलीस स्टेशन, बाजारपेठ, पोस्टाची गल्ली, शिवाजीनगर, नवभारत छात्रालय, आझाद मैदान असा 6 किमीचा होता. या मार्गादरम्यान असलेल्या पोलीस स्टेशन, उप जिल्हा रूग्णालय,एस.टी. आगार आदी प्रकारच्या विविध कार्यालयातील काही महिलांचा सायकलिंग क्लब तर्फे सन्मान करण्यात आला.
दापोली उपजिल्हा रुग्णालय येथील परिचारीका अनघा घाग, जाधव, महिला वैदयाकिय अधिकारी, महिला कर्मचारी, दापोली पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस उपनिरीक्षक ज्योती चव्हाण, मंजुश्री पाडावे, एसटी आगार व्यवस्थापक रेश्मा मधाळे, महिला उद्योजिका माधुरी विचारे, अर्पिता मालू, वैशाली मेहता, श्रद्धा गायकवाड, नेहा तोडणकर, सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील स्मिता सुर्वे, रितू मेहता, संजीवनी कदम, सारिका तलाठी, वर्षा गोरीवले, डॉ मानसी फाटक, डॉ शुभांगी फाटक, डॉ आनंदी सावंत, जयश्री खानविलकर, सुजाता प्रधान, योगसाधक अक्षदा साळवी, स्नेहा भाटकर, भाजीविक्रेते, प्रगतशील शेतकरी, गृहिणी अशा विविध क्षेत्रातील कार्यरत असलेल्या काही महिलांचा गौरव करण्यात आला. समाजासाठी करत असलेल्या कार्याबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले. यातील अनेक महिलांनी सायकल फेरीमध्ये सहभाग घेऊन सायकलवर स्वार होत दापोली सायकलिंग क्लबचा आनंद व्दिगुणीत केला. या सायकल फेरीचे नियोजन करण्यात केतन पालवणकर, अंबरीश गुरव, उत्तम पाटील, पराग केळसकर, अमोद बुटाला, संदीप भाटकर, सत्यवान दळवी, संजय पिंगळे इत्यादींनी मोलाची भूमिका बजावली.


























































