दापोली समुद्र किनाऱ्यावर आढळला महाकाय मृत व्हेल

809

दापोली येथील समुद्र किनाऱ्यावर बुधवारी सकाळी एक महाकाय व्हेल मृतावस्थेत आढळून आला. या महाकाय माशाला पाहण्यासाठी समुद्र किनाऱ्यावर गर्दी जमली होती. मुरूड समुद्र किनाऱ्यावर सापडलेल्या या व्हेल माशाचा पंचनामा करून दापोली वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी त्याचे सोपस्कार पार पाडले.

मुरूड ग्राम पंचायतीने नेमणुक केलेले लाईफ गार्ड राजेश शिगवण हे नेहमी प्रमाणे सकाळी समुद्र किनाऱ्यावर फेरफटका मारत असताना त्यांना लांबून बहुतेक एखादी बोट नांगरलेली असावी अशाप्रकारचा अंदाज आला.मात्र ते पुढे गेल्यावर त्यांना दुर्गंधी येऊ लागली. आणखी जवळ गेले असता त्यांना एक महाकाय मासा मृतावस्थेत पडल्याचे दिसले. त्यांनी याबाबत मुरूड ग्राम पंचायतीचे सरपंच सुरेश तुपे यांना सांगितले. त्यानंतर सरपंच तुपे यांनी परिक्षेत्र वनाधिकारी दापोली तसेच पोलिस ठाणे यांना संपर्क करून ही घटना सांगितली.

परिक्षेत्र वनाधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार हा मासा अंदाजे दहा दिवस आधी तरी मृत झालेला असावा. तो समुद्राच्या पाण्याला आलेल्या भरतीच्या लाटांनी मुरूड समुद्र किनाऱ्या बाहेर फेकला गेला. या माशाची लांबी ही 73 फुट असून वजन अंदाजे 5 टन आहे. या मृत माशाचे दापोली पशुवैद्यकीय अधिकारी यांनी शवविच्छेदन केले. त्यानंतर मुरूड समुद्र किनारी भागातच खोल खड्डा खणून दोन जेसीबीच्या सहा्ययाने व्हेल माशाला खोल खड्डयात गाडण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या