दापोलीमध्ये दोन एसटी बसची समोरासमोर धडक, सोळा जण जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दापोली येथे आज सकाळी आठ वाजता दोन एस टी बसची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. या अपघातात सोळा जण जखमी झाले आहेत.

दापोली येथे आज सकाळी हि दुर्घटना घडली.दोन एसटी बस समोरासमोर येऊन धडकल्याने हा अपघात झाला.या अपघातात बोरीवली -दापोली व दापोली -मुरादपूर या दोन गाड्यांची धडक बसली. यामध्ये अंदाजे सोळा जण जखमी झाले असून त्यामध्ये जास्त करून महाविद्यालयान व शाळकरी मुलांचा समावेश आहे जखमींना तात्काळ रूग्णालयात हलवून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत.