जेटसाठी 14 हजार कोटींची ऑफर

सामना ऑनलाईन । मुंबई

हवाई सेवा बंद असलेल्या जेटसाठी डार्विन प्लॅटफॉर्म ग्रुपने स्टेट बँक ऑफ इंडियाबरोबर बुधवारी झालेल्या चर्चेत तब्बल 14 हजार कोटींची ऑफर दिली. डार्विनचे सीईओ राहुल गणपुले यांनी ही माहिती दिली.

डार्विनची तेल, गॅस, आदरातिथ्य आणि बांधकाम क्षेत्रात मोठी गुंतवणूक आहे. दरम्यान, सीईओ आणि डेप्युटी सीईओने राजीनामा दिल्यानंतर बुधवारी शेअर्स 5 टक्क्यांनी घसरले.