
शिवसेनेच्या शिवतीर्थावरील दसरा मेळाव्याला कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. मेळाव्यासाठी मुंबई पोलिसांनी महत्त्वाच्या सूचना जारी केल्या आहेत. या सूचनांचे मेळाव्याला येणाऱ्या शिवसैनिक आणि शिवसेनाप्रेमींनी तंतोतंत पालन करावे व पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
पोलिसांच्या सूचना
– वीर सावरकर मार्गावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे तसेच सर्व शिवसेना नेत्यांचे आमगन होईल. त्यामुळे शिवसेनाप्रेमी व शिवसैनिकांनी या मार्गावर वाहने घेऊन येऊ नयेत.
– शिवसेना उपनेते, खासदार, आमदार, जिल्हाप्रमुख, विभागप्रमुख, निमंत्रित यांच्या आसन व्यवस्थेकरिता कालिकामाता मंदिराच्या शेजारून तसेच स्काऊट पॅव्हेलियनच्या बाजूने प्रवेश देण्यात येईल. या परिसरात आसन संख्या मर्यादित असल्याने निमंत्रण पत्रिकेशिवाय कोणालाही प्रवेश देण्यात येणार नाही.
– शिवसेना नेते व व्यासपीठावरील मान्यवरांसाठी वीर सावरकर मार्गावरील उद्यान गणेश मंदिरापुढील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ाच्या शेजारून प्रवेश व्यवस्था करण्यात आली आहे.
– इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पॅमेरामन व वृत्तपत्र प्रतिनिधी यांना समर्थ व्यायाम मंदिराकडून प्रवेश देण्यात येईल. त्यांनी आपले ओळखपत्र दाखवून प्रवेश करावा. इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या ‘ओबी व्हॅन’ समर्थ व्यायाम मंदिर परिसरातच उभ्या कराव्यात.
– शिवतीर्थावर येणाऱ्या शिवसैनिक व इतर मान्यवरांना शिवाजी पार्क येथे जाण्यास सोयीचे व्हावे याकरिता स्थानिक पोलीस व वाहतूक यंत्रणा नियंत्रित करणाऱ्या पोलिसांना वाहतुकीचे आणि गर्दीचे योग्य नियंत्रण करण्यासाठी सहकार्य करावे.
कुठे कराल?
– शिवसेना पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी त्यांची वाहने सी. रामचंद्र चौक व वसंत देसाई चौक या ठिकाणी सोडून त्यानंतर सदरची वाहने शिवाजी पार्क येथील कामगार क्रीडा भवन, वनिता समाज, संयुक्त महाराष्ट्र दालन, वीर सावरकर स्मारक येथे पार्ंकग करण्याकरिता घेऊन जावीत.
– पश्चिम व उत्तर उपनगरातून येणाऱ्या मोठय़ा वाहनांतून (उदा. बसेस, टेम्पो इत्यादी) कार्यकर्त्यांना माहीम जंक्शन येथे डावे वळण देऊन मोरी रोड मार्गे सेनापती बापट मार्गावरुन बाळ गोविंददास मार्ग जंक्शनपर्यंत नेऊन वाहने पार्क करून सभेसाठी जावे. जीप अथवा कार एल. जे. रोडने राजा बढे चौकापर्यंत न्यावीत व तेथे कार्यकर्ते उतरल्यानंतर सदर वाहने जे. के. सावंत मार्गावरील कोहिनूर वाहनतळ येथे पार्किंगकरिता पाठवावीत.
– पूर्व द्रुतगती महामार्गावरून येणारी मोठी वाहने (उदा. टेम्पो व बस इत्यादी) शीव जंक्शन येथून उजवे वळण घेऊन संत रोहिदास मार्गाने ‘वाय’ जंक्शन, ‘टी’ जंक्शन मार्गे धारावी-माहीम लिंक रोडने सेनापती बापट मार्गावर जातील. वाहनातील कार्यकर्ते उतरल्यानंतर सदर वाहने सेनापती बापट रोडवर पार्किंगकरिता पाठवावीत.
– दक्षिण मुंबईतून येणारी वाहने (उदा. टेम्पो व बस इत्यादी) डॉ. अॅनी बेझंट मार्गे काशीनाथ घाणेकर जंक्शन (रवींद्र नाटय़मंदिर)पर्यंत येतील व तेथे कार्यकर्ते उतरल्यानंतर ती सयानी रोडने सेनापती बापट मार्गावर पार्किंग करतील.
वाहने उभी करण्याची व्यवस्था खालीलप्रमाणे
बसेस, टेम्पो, टॅव्हलर्स, मोठे टेम्पो
– संपूर्ण सेनापती बापट मार्ग, दादर
– कामगार मैदान, सेनापती बापट मार्ग
– माहीम कॉजवे ते माहीम जंक्शन
– पाच गार्डन, माटुंगा
– एडनवाला रोड, माटुंगा
– नाथालाल पारेख, माटुंगा
– आर. ए. के. रोड, वडाळा
चारचाकी हलकी वाहने
– इंडिया बुल इंटरनॅशनल सेंटर, सेनापती बापट मार्ग, दादर
– इंडिया बुल्स 1 सेंटर, ज्युपिटर मिल कंपाऊंड, एलफिन्स्टन, सेनापती बापट मार्ग, दादर
– कोहिनूर वाहनतळ, जे. के. सावंत मार्ग, शिवाजी पार्क































































