आचरा रामेश्वर संस्थानच्या शाही थाटातील दसरोत्सवाची सांगता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मालवण

धडाडणारी तोफ, बंदुकीच्या फैरी आणि श्री देव रामेश्वराचे तरंग, महालदार, चोपदार, अब्दागिर, निशाण व बारा-पाच मानकरी, शाही लवाजम्यासमवेत रयत अशा संस्थानी थाटात आचरा येथील इनामदार श्री देव रामेश्वर संस्थानच्या दसरोत्सवाची शाही थाटात सांगता झाली. आचरा फुरसाई मंदिर येथे शिवलग्न सोहळा पार पडल्यानंतर हजारो भाविकांनी सोन्याचे प्रतीक मानलेल्या आपट्याची पाने सोने म्हणून वाटली.

देव रामेश्वराची पिंडी यावेळी “पंचमुखी महादेवाच्या ” रुपात सजविण्यात आली होती. हे अनोखे ” श्री “चे रूप पाहण्याचा दुर्मीळ आनंद लुटण्यासाठी रामेश्वर मंदिरात भाविकांची रीघ लागली होती. आचरा गावच्या माहेरवाशीणी फुरसाई देवीची खणानारळाने ओटी भरण्यास दाखल झाल्या होत्या. सकाळपासून श्री देव रामेश्वराचे दर्शन घेऊन माहेरवाशीणी श्री देवी फुरसाई मंदिराकडे ओठ्या भरण्यासाठी जात होत्या. यावेळी महिलां भाविकांनी लक्षणीय उपस्थिती दर्शविली होती.