दत्ता इस्वलकर यांचे निधन; गिरणी कामगारांचा आवाज हरपला!

गिरणी कामगार नेते दत्ता इस्वलकर यांचे आज दीर्घ आजारामुळे निधन झाले. उपचारासाठी त्यांना सर जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे आज संध्याकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. ते 72 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, मुलगा असा परिवार आहे.

दत्ता इस्वलकर हे स्वतः गिरणी कामगार होते. त्यामुळे त्यांना गिरणी कामगारांच्या प्रश्नांची जाण होती. गिरणी कामगारांना घरे मिळावीत यासाठी कामगार संघटनांनी उभारलेल्या आंदोलनात ते अग्रणी होते. उर्वरित लाखो कामगारांना घरे मिळावीत यासाठी ते शेवटच्या श्वासापर्यंत धडपड करत होते. उद्या सकाळी वरळी येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या