डेव्हिड वॉर्नर बिग बींच्या भूमिकेत!

ऑस्टेलियाचा धडाकेबाज फलंदाज डेव्हिड वॉर्नर याचे हिंदुस्थानी सिनेमाचे वेड सर्वशृत आहे. बॉलीवूडच्या अनेक गाण्यांवर त्याने व्हिडीओ बनवले आणि ते गाजलेसुद्धा. वॉर्नर आता तर चक्क बिग बी अमिताभ बच्चन यांच्या भूमिकेत जगासमोर आला आहे.

वॉर्नरने हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला असून तो चांगलाच व्हायरल झाला आहे. खास अमिताभ शैलीतील संवाद म्हणत हा संवाद कोणत्या चित्रपटातील आहे असा सवालही त्याने चाहत्यांना केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या