दाऊद इब्राहीमच्या मेव्हण्याची यूपीत गोळ्या घालून हत्या

जलालाबादचे नगराधथ्यक्ष शकील खान यांच्या भाचीसोबत पळून जाऊन निकाह करणाऱ्या दाऊद इब्राहीमच्या 35 वर्षीय मेव्हण्याची बुधवारी गोळ्या घालून हत्या करण्यात आली. निहाल खान असे हत्या झालेल्याचे नाव असून तो दहशतवादी, फरार डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरचा तो मेहुणा होता. जलालाबादमध्ये पुतण्याच्या लग्नाच्या रिसेप्शनसाठी तो आला होता.

2016 मध्ये निहालने शकीलच्या भाचीसोबत पळून जाऊन निकाह केला होता. मात्र, नंतर निहाल आणि शकीलमध्ये करार झाला होता. मात्र, निहालकर शकीलचा भाऊ कामिल याचा प्रचंड राग होता. त्याला बदला घ्यायचा होता, असे शकील खान याने पोलिसांना सांगितले. फ्लाईट चुकल्याने निहाल रस्तेमार्गे जलालाबादला आला होता. त्यावेळी संधी साधून त्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. दरम्यान, पाकिस्तानात लपून बसलेल्या हिंदुस्थानचा मोस्ट वॉन्टेड दहशतकादी दाऊद इब्राहीमला विषबाधा झाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. त्याला कराचीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याबाबतचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर पाकिस्तानमध्ये फेसबुक, एक्स, युटय़ूब आणि गुगल सेवा बंद करण्यात आल्या.