
कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा पुतण्या सोहेल कासकर हा दुबईमार्गे पाकिस्तानला फरार झाला आहे. सोहेल कासकरला अमेरिकेतील तपास यंत्रणांनी अमली पदार्थांच्या प्रकरणात अटक केली होती. या तपास यंत्रणांशी मुंबई पोलीस सातत्याने संपर्कात होते. कासकरने केलेला एक कॉल नुकताच ट्रेस करण्यात आला. त्यात तो पाकिस्तानला पळून गेल्याचे उघड झाले. अमेरिकन तपास यंत्रणांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

























































