दुर्देवी घटना! पारनेर तालुक्यातील मांडओहोळ जलाशयात दोन मुलं बुडाली

sunk_drawn

पारनेर तालुक्यातील मांडओहळ नगर शहरातील दोन मुलांचा रविवारी बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली असून त्यातील एका मुलाचा मृतदेह सापडला नव्हता.  तर सोमवारी सकाळी दुसऱ्या मुलाचा मृतदेह आढळल्याने एकच उडाली आहे. अथर्व श्रीनिवास श्रीराम (वय 18, रा. शिवाजीनगर, नगर-कल्याण रस्ता, नगर) सौरभ नरेश मच्छा (18, रा. नगर) हे दोन मुले मांडओहोळ जलाशयात बुडाले.

पारनेर तालुक्यातील मांडओहोळ जलाशयात रविवारी (दि. 19) दुपारी दोन तरुण बुडाले. दोघांपैकी एकाचा मृतदेह पाण्यातून रविवारी संध्याकाळी बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आले होते. तर दुसऱ्या मृतदेहाचा शोध सायंकाळपर्यंत सुरू होता. अखेर आज सोमवार दि. 20 रोजी सकाळी नऊच्या दरम्यान दुसरा मृतदेह ही सापडला आहे. शहरातील नगर-कल्याण रस्ता परिसरातील शिवाजीनगर भागातील सहा मुले दुचाकीवरून मांडओहोळ जलाशयात फिरण्यासाठी गेले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी अथर्व श्रीनिवास श्रीराम वय 18 वर्ष (मृत), सौरभ नरेश मच्छा वय 18 वर्ष (मृत), चैतन्य बालाजी सापा (वय 19, शिवाजीनगर, नगर), आकाश अनिल हुंदाडे (18), जीवन दिनेश पाटील (रा. रेल्वे स्टेशन, आगरकर मळा, नगर), अभिलाष रघुनाथ सुरम (18) हे सहा जण दुचाकीवरून निघोज येथून मांड ओहोळ जलाशयात पोहोचले.

दुपारी तीन ते चारच्या दरम्यान अथर्व श्रीराम, सौरभ मच्छा पाण्यात पोहोण्यासाठी उतरले. पोहत असताना त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे ते पाण्यात बुडाले. येथील जिल्हा प्रशासनाने तात्काळ मदत कार्य सुरू केलेले होते रविवारी रात्रीपासून हे मदत कार्य सुरू होते.