
सामना प्रतिनिधी । रत्नागिरी
रत्नागिरी तालुक्यातील भाट्ये येथे रस्त्याशेजारी रविवारी सायंकाळी एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह सापडला. मृतदेह गवताने झाकलेला असल्याने खून झालेला असण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
भाट्ये येथील रस्त्याच्या शेजारी अनोळखी पुरुषाचा मृतदेह सडलेल्या स्थितीत सापडला. मृतदेहाच्या कंबरेपासून पायांपर्यंतचा भाग गवताने झाकण्यात आला होता. मृतदेह सडलेल्या अवस्थेत असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली होती. रत्नागिरी शहर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. उशिरापर्यंत मृतदेहाची ओळख पटविण्याचा प्रयत्न सुरू होते.
































































