पालघरच्या समुद्र किनार्‍यावर आढळला देव माशाचा मृतदेह

91
सामना ऑनलाईन । पालघर

पालघरच्या माहीम समुद्रकिनार्‍यावर एका देव माशाचा मृतदेह आढळला आहे. एका स्थानिक मच्छीमाराला हा ५६ फुटांचा देवमासा आढळल्यानंतर त्याने पोलिसांना याबाबत माहिती दिली.पोलिसांनी या प्रकरणी वन विभागाला पाचारण केले. वन विभागाच्या एका टीमने याचा तपास सुरू केला आहे.

वनाधिकारी धनंजय पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार हा माशाचा काही महिन्यांपूर्वीच मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तसेच मृत माशाचे नमूने तज्ज्ञांकडे पाठवल्याचेही त्यांनी नमूद केले. देव माशाचा मृतदेह 56फूट ऊंच असून 15 फूट रुंद आहे. तसेच त्याचे वजन तब्बल 10 ते 12 टन आहे.

समुद्र जलचर तज्ज्ञ डॉ. दिनेश विन्हेरकर म्हणाले की या देवमाशाचा मृत्यू नैसर्गिक झाला असावा. बहुतांशा माशांचा मृत्यू  हा समुद्रातच होतो आणि त्यांचा मृतदेह असाच सडतो. या माशाच्या मृत्यूचे कारण इतरही असू शकतात असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.

 

आपली प्रतिक्रिया द्या