कोपरगाव तीनचारी येथे अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला

510

कोपरगाव तालुक्यातील तीनचारी येथे शिर्डी कोपरगाव महामार्गावर शेती महामंडळाच्या शेत जमिनीत काटेरी झुडपात 57 वर्षांच्या अज्ञात इसमाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. शुक्रवारी दुपारी 4 वाजेच्या सुमारास या भागात शेळ्या मेंढ्या चारणाऱ्या व्यक्तीला या ठिकाणी काटेरी झुडपात एका इसमाचा मृतदेह आढळल्यावर त्याने आसपासच्या नागरिकांना याबाबत सांगितले. ही माहिती पोलिसांना कळविताच पोलीसांनी घटनास्थळी येऊन पहाणी केली.

या इसमाच्या डाव्या हाताच्या नसा व गळा कापलेल्या अवस्थेत होता. आजूबाजूला दारूच्या बाटल्या पडलेल्या होत्या. हा मृतद्देह काट्यातून बाहेर काढला इसमाच्या डोक्याखाली लहान धारदार कटर ब्लेड आढळून आले. या व्यक्तीने आत्महत्या करण्यासाठी आपला हात व गळा कापला की कोणी दुसऱ्या व्यक्तीने त्याची हत्या केली, याबाबत तपास सुरू आहे. पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर,सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत नागरे,बोरसे यांच्यासह पोलीस हेड कॉन्स्टेबल गवसने, गवारे ,अंबादास वाघ,काटे,दारकुंडे, कोतकर,राम खरतोडे या पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. मृतदेह कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या