लाडके सर आणि कडक शिस्तीचे हेडमास्तर!

मनोहर जोशी यांची ‘जोशी सर’ अशी ओळख होती. शिवसेनेच्या वाटचालीत त्यांचा सिंहाचा वाटा राहिला. राजकारणासोबतच उद्योग, क्रीडा, साहित्य अशा क्षेत्रांतही त्यांचे भरीव योगदान राहिले. प्रत्येक टप्प्यावर त्यांनी आपला ठसा उमटवला. तमाम शिवसैनिकांसाठी जसे ते प्रेमळ सर होते तसे लोकसभेचे अध्यक्ष असताना कडक शिस्तीचे हेडमास्तर म्हणूनही त्यांचा दरारा पाहायला मिळाला. नांदवी ते वर्षा आणि वर्षा ते दिल्ली हा त्यांचा राजकीय प्रवास थक्क करणारा होता…

या मुंबई शहरात आल्यानंतर मी महापौर होईन, असं वाटलं नव्हतं आणि या राज्याच्या मुख्यमंत्री होईन असं तर कधीच वाटलं नाही. पण हे घडू शकलं, हे अशक्य नाही. माझ्या जीवनामध्ये हे जे घडलं ते दुसऱया कुणाच्याही जीवनात घडू शकतं याच्यामध्ये खऱया अर्थाने आयुष्याची मजा आहे आणि ती अनुभवता आली हे आयुष्यात कमावलं! – मनोहर जोशी